Skip to main content

वास्तु नुसार व्यक्ति की व्यक्ति नुसार वास्तु?

प्रश्न आहे वास्तु नुसार व्यक्ति की व्यक्ति नुसार वास्तु?

इथे पुन्हा अगदी पायाभूत गोष्टीं (बेसिक्स) पासून विचार करावा लागेल. मुळात वास्तु म्हणजे काय?
"प्रासादादिनी वास्तुनि वस्तुत्वाद्वस्तु संश्रयात।
वस्तुभिर्निर्मितत्वाच्च वास्तुनिती स्मृतानिच।।"

म्हणजे मंदिर व इतर सर्व वास्तूंच्या आश्रयाने वस्तू राहतात व वस्तुं पासून यांची निर्मिती होते म्हणून यांना वास्तु असे म्हणतात. जसे सिमेंट, विटा, दगड, रेती, लाकूड यासारख्या अनेक वस्तूंपासून यांची निर्मिती होते. व अनेक वस्तु यांच्या आश्रयाने राहतात उदा. टेबल, खुर्च्या, सोफा, बेड, माणसं, प्राणी इ. अनेक. वस्तूंपासून बनतं व त्यांच्या आश्रयाने वस्तू राहतात म्हणून त्यांना वास्तु म्हणायचं असा याचा वरवरचा अर्थ आहे.  तर आता शास्र 'वस्तू' ची व्याख्या काय करतं ते पाहू
"सर्वेषु भूतेषु यद् वसती तद् वस्तुः"
सर्व भूतांमधे जे वसतं म्हणजेच राहतं ते म्हणजे वस्तू. आणि आपण जाणतोच की सर्व भूतांमधे, चराचरात, सजीव निर्जीवात जे राहतं ते म्हणजे चैतन्य. म्हणजेच वस्तु चा खरा अर्थ चैतन्य, परमात्मा, ब्रह्म असा आहे.

वास्तु चा वरवरचा अर्थ आपण वर पाहिलाच होता, पण वस्तू चा अर्थ पाहिल्यावर खरा अर्थ लक्षात यायला सोपे जाईल. वस्तूपासून म्हणजे चैतन्या पासून यांची निर्मिती होते व वस्तू म्हणजे चैतन्य यांच्या आश्रयाने राहते अशा सर्व आकारबद्ध गोष्टींना वास्तु असे म्हणतात. म्हणून सजीव निर्जीव सर्व गोष्टी वास्तु च आहेत. व्यक्ति च्या आत आत्मा म्हणजे परमचैतन्य वास करतं म्हणून ती व्यक्ती सुद्धा एक वास्तुच आहे. व्यक्ति मध्ये ही चैतन्य आहे. घरात सुद्धा चैतन्य आहे. त्या घराच्या आवारात सुद्धा आहे, नगरात, शहर रुपी वास्तु मधे, राज्य रूपी, देशरुपी, पृथ्वी रुपी, विश्व रुपी, ब्रह्मांड रुपी वास्तु मध्ये ही हेच चैतन्य वास करतं. आणि याच चैतन्यातून या सर्वच गोष्टींची निर्मिती झाली आहे. म्हणून या सर्व वास्तू आहेत. निराकार अशा चैतन्याची ही सर्व व्यक्त व साकार रूपे आहेत.
चैतन्याची दोन वैशिष्ट्ये आहेत. 1) प्रकाशित असणं म्हणजेच तेजःपुंज असणं आणि 2) नादमय असणं
आपल्या कडे योगी पुरुष म्हणूनच चैतन्याचं ध्यान करतांना नाद व प्रकाशित बिंदु यांचं ध्यान करतात वा अनुभव करतात.
'ॐकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः'
असा उल्लेख आला आहेच.
तेव्हा लक्षात घ्या की वास्तुशास्त्र हे चैतन्याचं व ते जिथे जिथे राहतं त्या स्पेस चं शास्र आहे. आपण ऐकतो की वास्तुशास्त्र हे एनर्जीचे शास्र आहे. या नाद व प्रकाशित बिंदु च्या ध्यानातून आपण या चैतन्याची निर्मितीक्षमता वाढवत असतो. संकल्प, विचार, अपेक्षा प्रत्यक्षात येण्यासाठी, मूर्त स्वरूपात येण्यासाठी या साधनेचा उपयोग होतो. अशी साधना हे व्यक्ति रुपी वास्तु साठी सर्वोत्तम साधन. पण प्रत्येक व्यक्ति ही योगी नाही व त्यामुळे प्रत्येक व्यक्ति सिद्ध पुरुष नाही. मग अशा सामान्य व्यक्ति साठी साधन कोणते तर राहती वास्तु.
म्हणून वास्तु शास्त्रात अशा बिल्ट स्पेस म्हणजे भवन किंवा हर्म्य ( व्यवहारिक भाषेत, घर) बांधताना राहणाऱ्या लोकांच्या जन्म नक्षत्रांनुसार आय, व्यय, योनी, अंश, नक्षत्र, वार, आयु, योग इ. सुत्रांनुसार योग्य मोजमापांमधे व अंगुल प्रमाणात त्या घराची मोजमापे घ्यायला सांगितली आहेत. अशा प्रकारे बांधकाम केलेली वास्तु सिद्ध वास्तु असते. अशी सिद्ध स्पंदनांनी युक्त वास्तु आपले विचार, स्वप्न, अपेक्षा यांना मूर्त स्वरूप देऊन प्रत्यक्षात आणते. अशी योग्य मोजमापांनुसार वास्तु नसल्यास वास्तुशास्त्रीय उपायांनी वास्तु ची क्षमता काही प्रमाणात वाढवता येईल.
तरी सर्व वास्तू अशा नसतात म्हणून मग मंदिरांची व्यवस्था. बहुतेक सर्व प्राचीन दगडी मंदिरे ही अशाच सिद्ध वास्तु आहेत. अशा मंदिरांमधेही अशी उत्तम स्पंदनै मिळतात.
आता मुळ प्रश्नाकडे येऊ. हे एनर्जीचे शास्र असल्याने एनर्जीचे सर्व नियम याला लागू आहेत. जसे नेहमीच जास्त एनर्जी कमी एनर्जी वर आपला प्रभाव टाकते. एखादा सिद्ध योगी पुरुषाच्या साधनेमुळे तो एखाद्या सामान्य वास्तुला, आजुबाजुच्या स्पेसला प्रभावित करू शकेल. तिला आणखी चैतन्यमय, आनंदमय करू शकेल. याउलट एखादी उत्तम वा दोषपूर्ण वास्तु एखाद्या सामान्य व्यक्तिला प्रभावित करेल व त्या व्यक्ति वर चांगले वाईट परिणाम घडवून आणेल. म्हणजे अशा प्रकारे आपापल्या क्षमतेनुसार स्पेस व व्यक्ति एकमेकांना प्रभावित करू शकतात. म्हणजे कधी व्यक्ति नुसार वास्तु घडेल, बदलेल, तर कधी किंवा जास्तीत जास्त वेळा वास्तु मुळे व्यक्ति घडेल, बिघडेल वा बदलेल. एवढं मात्र नक्की की व्यक्तिला स्पेस वर, वास्तु वर प्रभाव टाकायचा असेल तर खुप साधनेची गरज आहे. सामान्य व्यक्ति रुपी वास्तु वर मात्र भवनरुपी वास्तुच आपला प्रभाव दाखवते हे निश्चित. म्हणून एकतर आपण साधना वाढवली पाहिजे किंवा वास्तुशास्त्राची मदत घेऊन वास्तु सिद्ध केली पाहिजे.

शंका, प्रश्न असल्यास खालील क्रमांकावर काॅल वा वाॅट्सॅप करा, वा मेल करा.
मोल लेले (तथास्तु वास्तु रिसर्च फाऊंडेशन)
मो. 8850517626
ईमेल. leleamol1@gmail.com
tathastuvaastu@gmail.com
vaastuamol@gmail.com

Comments

Popular posts from this blog

वास्तुशांती

                                    वास्तुशांती   ( टीप : ज्यांचा भारतीय शास्त्रांवर विश्वास नाही, श्रद्धा नाही, त्यांच्यासाठी हा लेख नाही. त्यामुळे त्यांनी आक्षेप कृपया मांडू नयेत. ज्या श्रद्धावंतांना खरोखरीच शंका आहेत, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.)                वास्तुशांती बद्दल अगदी जाणकार व अभ्यासकांच्या सुद्धा मनात काही गैरसमज आहेत असे गेल्या काही महिन्यांपासून लक्षात येत आहे. त्यामुळे वास्तुशांती बद्दल मी काही लिहावे व गैरसमज दूर करावे अशी सूचना, विनंती काहीजण सातत्याने करत आहेत व त्यासाठी पाठपुरावा सुद्धा करत आहेत. वेळेत लेख पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल या  सर्व शास्त्र प्रेमी मित्रांची आधी क्षमा मागतो.                             वास्तुशा...

आधी वास्तुशास्त्र तर समजून घ्या.

*कोणीतरी मला फॉरवर्ड केलेला लेख व त्याला माझे उत्तर*        *फॉरवर्डेड लेख* *वास्तु* केवढी पवित्र जागा! जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक...